Breaking News

पाली पोलिसांची रिले दौड; नागरिकांकडून गावोगावी स्वागत

पाली : रामप्रहर वृत्त

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पाली पोलीस ठाण्याच्या वतीने बुधवारी (दि.17) 75 किलोमीटर रिले दौंडचे आयोजन करण्यात आले होते. या दौडमधील सहभागी झालेल्या पोलिसांचे गावागावाजवळ जंगी स्वागत करण्यात आले. ही अमृत महोत्सवी दौड पाली पोलीस ठाणे येथून बुधवारी 7 वाजता सुरू झाली. सुरुवातीला काही पोलीस  झाप गावापर्यंत एकत्र धावले. त्यानंतर एका नंतर एक असे दहा ते बारा पोलिसांनी हातात राष्ट्रध्वज घेऊन 75 किलोमीटरचे अंतर धावून पूर्ण केले. पाली पोलीस ठाण्यापासून सुरू झालेली ही दौड झाप, वावळोली, सिद्धेश्वर, पुई, खांडसई, वैतागवाडी, नाडसूर, ठाणाळे, कोंडगाव, नवघर, आसरे, कासारवाडी, हरनेरी, जांभुळपाडा, परळी, नानोसे, वर्‍हाड-जांभुळपाडा, पेडली, तिवरे, चिवे, मजरे जांभुळपाडा, रासळ, आंबोले मार्गे पुन्हा पाली पोलीस ठाण्यात आली. तेथे या दौंडची सांगता भारत माता की जय या जयकाराने करण्यात आली.दरम्यान, दौडमधील पोलिसांचे गावागावाजवळ स्वागत करण्यात येत होते. ही दौड सुरू करताना पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, तहसीलदार दिलीप रायण्णावर, गटविकास अधिकारी विजय यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे यांच्यासह पोलीस कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

गुरूकुल प्रज्ञाशोध परीक्षेत ‌सीकेटी‌ विद्यालयाचे यश

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल ः रामप्रहर वृत्तकोल्हापूर येथील गुरूकुल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गुरूकुल …

Leave a Reply