Breaking News

तळ्यातील रहाटाड ग्रामपंचायत भाजप-शिंदे गट युतीकडे

माणगाव : प्रतिनिधी

तळा तालुक्यातील एकमेव रहाटाड ग्रामपंचायतीमध्ये भाजप व बाळासाहेबांची शिवसेना युतीने विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला. रहाटाडमध्ये सत्ता आल्याने गुलाल उधळत, फटाक्यांच्या आतषबाजीत भाजप व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. रविवारी (दि.18) तळा तालुक्यातील रहाटाड ग्रामपंचायतीसाठी मतदान घेण्यात आले होते. मंगळवारी सकाळी मतमोजणी सुरू झाली. सरपंच पदाच्या निवडणुकीत भाजप व शिंदेगटाच्या उमेदवार मिताली करंजे यांना 575 मते मिळवून त्या विजयी झाल्या. ग्रामपंचायत सदस्यपदाच्या निवडणुकीत भाजप व शिंदे गट युतीचे उमेदवार चांगदेव पाटील, नियती नागे, रूक्मिणी मालुसरे, मंगल कंबु, चोगले सज्जाद मोहंमद शफी हे विजयी झाल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत फटाक्यांची आतषबाजी केली. भाजपचे प्रदेश  सरचिटणीस रवींद्र मुंढे, तळा तालुकाध्यक्ष निलेश रातवडकर, शिंदे गटाचे राकेश वडके आदिंनी पुष्पगुच्छ देऊन विजय उमेदवारांचे अभिनंदन केले.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply