कर्जत : प्रतिनिधी
तालुक्यातील मांडवणे, कळंब, उक्रूळ, दहिवली तर्फे वरेडी, वावळोली, कोंदिवडे आणि वेणगाव या सात ग्रामपंचायतीच्या निवडणुकासाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते. मंगळवारी (दि. 20) मतमोजणी झाली. त्यामध्ये बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे दोन, ठाकरे गटाचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि शेकापचा एक थेट सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले. तालुक्यात मतदारांनी कुणालाच नाराज न करता संमिश्र यश दिले.
थेट सरपंच निकाल
ग्रामपंचायत : विजयी उमेदवार : पक्ष
वावळोली : एकनाथ गणपत भगत : शिंदे गट
वेणगाव :अश्विनी मंगेश पालकर : राष्ट्रवादी काँग्रेस,
कोंदिवडे : प्रमोद देशमुख : राष्ट्रवादी काँग्रेस,
दहिवली तर्फे वरेडी : मेघा अमर मिसाळ : शिंदे गट,
मांडवणे : रंजना बाळकृष्ण सावंत : ठाकरे गट,
उकरूळ : नीलिमा योगेश थोरवे : ठाकरे गट,
कळंब : प्रमोद तुकाराम कोंडीलकर : शेकाप