पनवेल : रामप्रहर वृत्त
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई शहर अंतर्गत रविवारी (दि. 18) जिल्हा क्रीडा संकुल धारावी येथे झालेल्या मुंबई विभागस्तरीय शालेय वुशू स्पर्धेत नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. रोहित मालविया (11 वी कॉमर्स) याने प्रथम क्रमांक तर निश्चय पंत (11वी सायन्स) याने द्वितीय क्रमांक पटकावला. प्रथम क्रमांक मिळविणार्या रोहित मालविया याची राज्यस्तरीय वुशू स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, अध्यक्ष अरुणशेठ भगत, सचिव डॉ. एस. टी. गडदे, सहसचिव भाऊसाहेब थोरात, प्राचार्य प्रशांत मोरे, पर्यवेक्षक अजित सोनवणे, पर्यवेक्षिका स्वाती पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.