पनवेल : रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ पनवेल आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 23) जयपूर फूट बसविण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात सकाळी 9 वाजता हा उपक्रम होणार आहे.
मोफत कृत्रिम हात व पाय अर्थात जयपूर फूटसंदर्भात ऑक्टोबर महिन्यात शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्या शिबिरात हात, पाय नसलेल्या दिव्यांग व्यक्तींची तपासणी करून कृत्रिम हात, पायसाठी मापे घेण्यात आली होती. त्या 102 व्यक्तींना हे कृत्रिम अवयव बसविण्यात येणार आहेत.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …