Breaking News

वाडा-मनोर रस्त्याचे रुंदीकरण करावे; अधिवेशनात लक्षवेधी

नवी मुंबई : बातमीदार

वाडा-मनोर रस्त्याचे रुंदीकरण करण्याची लक्षवेधी आमदार गणेश नाईक यांनी अधिवेशनात मांडली. वाडा मनोर हा रस्ता 64 किलोमीटरचा असून या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत, 392 कोटी रुपयांना हा रास्ता बीओटी तत्वावर दिला होता परंतु आज त्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे आणि दुर्घटनेचे प्रमाणदेखील वाढले आहे आमदार गणेश नाईक यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून ही मागणी केली की, भविष्यातील विचार करून या रस्त्याचे रुंदीकरण केले जावे आणि त्यासाठी किती कालावधी लागणार याची माहिती दिली जावी. यावर उत्तर देताना संबंधित मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गणेश नाईक यांच्या माध्यमातून विचारलेला प्रश्न महत्वाचे असल्याचे सांगत रस्त्याला व्हाईट टॉपिंग करून उर्वरित 124 कोटी खर्च करण्यासाठी शासन विचाराधीन आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply