Breaking News

पनवेल महापालिका हद्दीत सिडकोने विकासावर भर द्यावा

आमदार प्रशांत ठाकूर यांची विधिमंडळात मागणी

नागपूर : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सार्वजनिक सोयी सुविधा विकसित झाल्या पाहिजे यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली. त्या अनुषंगाने पनवेल महानगरपालिकेकडे देखील सिडको दुर्लक्ष करणार नाही याची दक्षता घेण्याचे आश्वासन रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिले.
आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई विकासाच्या दृष्टिकोनातून सिडको संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला अनुसरून आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपप्रश्न मांडत पनवेल महानगरपालिका हद्दीत सिडकोने जास्तीत जास्त सार्वजनिक विकासावर भर देण्याची मागणी केली. मुंबईच्या निर्मितीमध्ये नवी मुंबई महापालिकेच्या बरोबरीने आता पनवेल महापालिकेची निर्मिती झाली आहे आणि महापालिका हद्दीमध्ये जिथे महापालिका नियोजन प्राधिकरण आहे त्याही ठिकाणी अशाच पद्धतीने सिडकोच्या ताब्यात असलेल्या भूखंडांवर वेगवेगळ्या सामाजिक सुविधा विकसित करण्याची आवश्यकता आहे, पण त्या ठिकाणी सर्रास इमारती विकसित करण्यासाठी म्हणून त्यांची विक्री किंवा लाँग लीज करण्याच्यासाठी सिडकोने जाहिराती काढल्यास सिडकोला निधी मिळणार आहे. यातून सिडकोला मोठ्या प्रमाणात निधी मिळणार आहे, पण ज्या शहराची निर्मिती केली आहे, तेही त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे त्याच्याकडेही तितक्याच सहानुभूतीने सिडको व शासनाने पहावे आणि पनवेल महापालिकेलासुद्धा या दृष्टिकोनातून जे रिप्रेझेंटेशन द्यायचे त्याच्यासाठी सोबतीने संधी देण्यात यावी आणि महापालिकेच्या हद्दीमध्ये सार्वजनिक सोयी सुविधा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये विकसित झाल्या पाहिजेत आणि याच्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात बोलताना अधोरेखित केले.
सिडको दुर्लक्ष करणार नाही-पालकमंत्री
यावर आपल्या उत्तरात बोलताना उद्योग व रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी, पनवेलच्या संदर्भामध्ये जो प्रश्न या ठिकाणी मांडलाय त्याचा देखील सकारात्मक विचार केला जाईल, असे सांगतानाच या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांच्या बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर यांना आमंत्रित करण्यात येणार असून पनवेल महापालिकेकडेदेखील सिडको दुर्लक्ष करणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असेही नामदार उदय सामंत यांनी आश्वासित केले.

Check Also

राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …

Leave a Reply