Breaking News

रायगडात नववर्ष स्वागताचा उत्साह!

फॉर्महाऊस व खासगी बंगल्याना सर्वाधिक पसंती

खोपोली : प्रतिनिधी
कोरोनाचे गोंगावणारे संकट, उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाची करडी नजर असली तरी, नवर्षाचे स्वागत करण्याची जोरदार तयारी सुरू आहे. लोणावळा, खंडाळा रिसॉर्टबरोबर खालापूर-खोपोली परिसरातील विविध फॉर्महाऊस, खासगी बंगल्यांना पार्टी आयोजनासाठी पसंती देण्यात येत आहे.
तालुक्यातील अनेक फॉर्महाऊस व बंगले बुक करण्यात आली आहे. दुसरीकडे स्थानिक पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाची या सर्व घडामोडींवर करडी नजर आहे. उत्साहात कोणताही नियमबाह्य व अनुचित प्रकार सहन केला जाणार नाही, असा इशाराच पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबई, पुण्यातील विविध कॉर्पोरेट गु्रप व  तरुणाईकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. रायगडमधील समुद्रकिनारे, लोणावळा-खंडाळा बरोबर खोपोली-खालापूर तालुक्यातील फॉर्महाऊस व खासगी बंगल्याना सर्वाधिक पसंती आहे. खानावळी व अन्य आयोजनाची लगबग सुरू आहे. मोठे रिसोर्ट, रेस्टॉरंट व बारकडूनही आकर्षक सूट देऊन ग्राहकांना आकर्षित करण्यात येणार आहे. उपपोलीस अधीक्षक संजय शुक्ला यांनी दिलेल्या सूचनांनुसार स्थानिक स्तरावर पोलीस पाटील यांचीही मदत पोलिसांना मिळणार आहे.

नववर्षाचे स्वागत व उत्साह साजरा करतांना अपघात तसेच अनुचित प्रकार रोखण्यासाठी व नियमांचे पालन होण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे. त्या त्या गावचे पोलीस पाटील सामाजिक कार्यकर्त्यांचीही मदत होणार आहे. आनंद साजरा करण्यात कोणतीही आडकाठी नसून, अतिउत्साहीपणा व गैरप्रकार होऊ नयेत याची काळजी सर्वांनी घ्यावी.
-संजय शुक्ला, उपविभागीय पोलीस अधीक्षक, खालापूर

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply