Breaking News

एक्स्प्रेस वेवर अपघातात दोघे जखमी

खालापूर ः प्रतिनिधी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अनधिकृत प्रवेश करून पुण्याकडे प्रवास करणार्‍या तीन मोटारसायकलस्वारांपैकी दोघा दुचाकींना अपघात होऊन यात दोन जण जखमी झाले. आयआयबी पेट्रोलिंग आणि लोकमान्य रुग्णालयाच्या रुग्णवाहिका त्या ठिकाणी पोहचल्या आणि त्यांनी जखमींना मदत केली. पोलिसांनी संबंधित मोटारसायकलस्वारांवर कारवाई केली आहे. द्रुतगती मार्गावरून मोटरसायकलस्वारांना बंदी असतानाही या मार्गाने मुंबई-पुण्याचे बाइकस्वार वेगाने जात असतात, मात्र काही वेळा त्यांच्यावर पोलीस कारवाई करतात, तर काही वेळा हे बाइकस्वार सुसाट वेगात बेकायदेशीरपणे जात असतात.  बाइकस्वारांमुळे द्रुतगती मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply