डेहराडून : वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज खेळाडू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला असून यामध्ये ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून ऋषभ घरी येत असताना त्याच्या कारला हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
रूरकीच्या नारसन सीमेवर हम्मदपुर झालजवळील एका वळणावर ऋषभच्या कारचा अपघात झाला. यामध्ये ऋषभ गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने देहरादून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंतच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे.
अपघातस्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार ऋषभची कार रेलिंगला धडकली, ज्यानंतर कारने पेट घेतला. मोठ्या प्रयत्नानंतर कारची आग विझविण्यात यश आले.
Check Also
पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper