
कळंबोली : प्रतिनिधी, पनवेल : वार्ताहर
राज्यभरात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा पुन्हा एकदा वाढत असताना, दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे कोरोनावर मात करणार्या पोलिसांचे प्रमाणही वाढत आहे. आतापर्यंत 10 हजार 111 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. आज पोलीस ठाण्यातील पाच पोलिसाने कोरोनावर मात करत आपल्या कार्यभार स्वीकारला त्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश गायकवाड यांनी पुष्पगुच्छ देऊन व पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. त्याांनी कोरोनावर मात केल्याने इतर कर्मचारी यांचे मनोधैर्य वाढवण्यात आले आहे.
राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या विविध नियमांचे अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस कार्यरत आहेत. आतापर्यंत पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अडीच लाखाच्यावर गुन्हे नोंद केले आहेत. तर 33 हजार 507 जणांना अटक करण्यात आली आहे. तर विविध कारवाईत तब्बल 1 लाखाच्या वर वाहने पोलिसांनी जप्त केले आहे. या कारवाई दरम्यान राज्यभरात आतापर्यंत साडेबारा हजाराच्यावर पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. यात 1302 पोलीस अधिकार्यांचा समावेश आहे. दिलासादायक बाब म्हणजे 1000 अधिकार्यांसह नऊ हजार 111 असे एकूण 10 हजाराच्या वर पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. यापैकी बरेच जण पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत.
कोरोना बाधित झालेल्या कळंबोली पोलीस ठाणे हद्दीतील हवालदार 1690 बाळासाहेब गुलींग, हवालदार 1540 शहाजी मेहेर, हवालदार 1554 गोपाळ राठोड, हवालदार 143 सुषमा पाटील, नाईक 2590 रुपाली राऊत यांनी कोरोनावर मात करत आपल्या कर्तव्यावर हजर झाल्या आहेत. सद्यस्थितीत 300 च्या आसपास अधिकार्यांसह दोन हजारच्यावर पोलिसांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.