नेरूळ : बातमीदार
सानपाडा सिडको वसाहत क्रीडा व कला महोत्सवाला प्रतिसाद लाभला. या महोत्सवातील विविध स्पर्धांमध्ये स्पर्धकांनी सहभाग घेत आपले कौशल्य दाखविले.
या महोत्सवात बुद्धिबळ, कॅरम, फुटबॉल, धावणे, निबंध, चित्रकला, वक्तृत्व अशा स्पर्धा रंगल्या. फुटबॉल स्पर्धेत 28 संघ सहभागी झाले होते. बुद्धिबळ स्पर्धेत 46, तर कॅरम स्पर्धेत 58 खेळाडूंनी सहभाग नोंदविला. याशिवाय 100 मी. धावणे स्पर्धेत वेगळे मैदान घेऊन दिवसभर ही स्पर्धा खेळविण्यात आली.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper