Breaking News

शिवाजीनगर प्रीमियर लीग रंगली

लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त
आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगरच्या वतीने रविवारी (दि. 1) आयोजित एकदिवसीय शिवाजीनगर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा उत्साहात झाली. या स्पर्धेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
छत्रपती शिवाजी महाराज मैदानात झालेल्या या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी झाले होते. या वेळी भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, अरुण घरत, भागिरथी मोकल, नंदा ठाकूर, आशा म्हात्रे, भाऊ कडू, महेंद्र कडू, अमृत ठाकूर, दर्शन ठाकूर, सुजित ठाकूर, अमित कडू, सुदीप ठाकूर, मयूर ठाकूर, निलेश ठाकूर, शशिकांत कडू, व्ही. के. ठाकूर, दीपक गोंधळी, प्रवीण ठाकूर, प्रभाकर ठाकूर, महेश ठाकूर, निलेश म्हात्रे यांच्यासह खेळाडू आणि क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. समर्थ इलेव्हन संघाने विजेतेपद पटकाविले.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply