पनवेल तालुक्यात 290 नवे कोरोनाबाधित

तिघांचा मृत्यू; 376 रुग्णांची कोरोना संसर्गावर मात

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 18) कोरोनाचे 290 नवीन रुग्ण आढळले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 376 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 215 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 254 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 75 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे, तर 122   रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.

खांदा कॉलनी सेक्टर 9 वृंदावन सोसायटी आणि कळंबोली सेक्टर 4 सत्य सागर सोसायटी येथील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 20 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2658 झाली आहे. कामोठेमध्ये 64 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3541 झाली आहे. खारघरमध्ये 53 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णसंख्या 3303 झाली आहे.

नवीन पनवेलमध्ये 26 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2974 झाली आहे. पनवेलमध्ये 50 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2880 झाली आहे. तळोजात दोन नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 700 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 16,056 रुग्ण झाले असून 13,552 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.40 टक्के आहे. 2137 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 367 जणांचा मृत्यू झाला आहे.

Check Also

Как использовать аналитические функции на 1xbet зеркало

Как использовать аналитические функции на 1xbet зеркало Аналитические функции на платформе 1xbet зеркало предоставляют пользователям …

Leave a Reply