Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयातील क्रीडा महोत्सवाचे पारितोषिक वितरण

मान्यवरांची उपस्थिती; विद्यार्थ्यांचा गौरव

पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात झाला. या महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ ‘रयत’चे मॅनेजिंग कौंन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि विद्यालयाचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि. 5) झाला.
दोन दिवसांपासून सुरू असणार्‍या या महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत आपले कौशल्य दाखवले. लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी या स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र आणि पदक देऊन गौरव केला. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून खेळाचे महत्त्व सांगितले.
पारितोषिक वितरण समारंभास पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागाचे निरीक्षक रोहिदास ठाकूर, जनसंपर्क अधिकारी बाळासाहेब कारंडे, भाजप ओबीसी जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा नेते हॅप्पी सिंग, माजी नगरसेविका पुष्पा कुत्तरवडे तसेच मुक्ता खटावकर, राजश्री नायर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply