पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सिंगापूरमधून पुण्यातील उद्योजक सुधीर मेहता यांच्या सहकार्याने आठ हजार ऑक्सिजन कॉन्सट्रेटर व साडेतीन हजार व्हेंटिलेटर्स एअर इंडियाच्या माध्यमातून एअर लिफ्ट करण्यात येणार असल्याची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सर्व गोष्टी भारतात आणण्यासाठी परवानगी दिल्याचेही पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. सुधीर मेहता जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अपग्रेड करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी वर्षभरात 200 कोटी उभे केलेत. त्यांनी सिंगापूरमध्ये आठ हजार ऑक्सिजन कॉन्सट्रेटर व साडेतीन हजार व्हेंटिलेटर्स असल्याचे सांगितले. सिंगापूर सरकारच्या कॉर्पोस फंडअंतर्गत सिंगापूर सरकारने मेहतांना ऑफर दिली की 50 टक्के रकमेत आम्ही तुम्हाला हे साहित्य देतो. न्यायची व्यवस्था तुम्ही करा, अशी माहितीही पाटील यांनी दिली.
Check Also
सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …