कळंबोली : रामप्रहर वृत्त : पनवेल महापालिकेच्या नगरसेविका मोनिका प्रकाश महानवर यांच्यावतीने सार्वजनिक हळदी-कुंकू समारंभाचे कळंबोली येथे रविवारी (दि. 9) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल आणि वर्षा प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कळंबोली येथे आयोजित या हळदी-कंकूसमारंभात महिलांसाठी विविध करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महिलांना पैठणी आणि विविध भेटवस्तू देण्यात आल्या. या कार्यक्रमास पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, नगरसेविका दर्शना भोईर, प्रमिला पाटील, हर्षदा उपाध्याय, लीना गरड, भाजप नेते रामदास महानवर, प्रभाग क्रमांक 10च्या अध्यक्ष अंजली पाटकर, सरचिटणीस अपर्णा सरोज, सरिता शिंदे, सुरेखा टावरे, संध्या मदने, साक्षी गावंड, रेणुका जाधव, दुर्गा सहानी, विजया कदम, सप्तश्रृंगी महिला बचत गट, एकवीरा आई महिला बचत गट, शिवपार्वती महिला बचत गट, सिध्दी महिला बचत गट, काळूबाई प्रसन्न महिला बचत गट यांच्यासह आदी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कळंबोली येथील विद्याताई सामाजिक संस्थेच्या वतीने हळदी-कुंकू समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उत्तर रायगडचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी उपमहापौर जगदिश गायकवड, महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, वर्षा प्रशांत ठाकूर, माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशिला घरत, लीना गरड, दर्शना भोईर, हर्षदा उपाध्याय, संतोषी तुपे, पुष्पा कुत्तरवडे, राजश्री वावेकर, अॅड. वृषाली वाघमारे, तेजस्विनी गलांडे, वनिता पाटील, श्वेता शेट्टी, सुशिला शर्मा, महिला पोलीस वर्ग, आयोजक नगरसेविका विद्या गायकवाड यांच्यासह आदी महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.