पनवेल : वार्ताहर
पनवेल नव्हे रायगड, नवी मुंबई परिसरातून दर्शन आणि जिवंत देखाव्यासाठी प्रसिद्ध असलेला खांदेश्वरचा राजाने यंदा आपल्या साधेपणाचे दर्शन घडवले. कोरोना विषाणूंचे संक्रमण होऊ नये म्हणून यावर्षी देखावा आणि रोषणाई करण्यात आली नाही. सोशल डिस्टन्सिंग ठेऊन गणेश भक्त बाप्पांचे दर्शन घेत आहे.
खांदा वसाहतीत नगरसेविका सीता सदानंद पाटील यांच्या ओमसाई महिला व बाल मित्र मंडळाच्या खांदेश्वरच्या राजासमोर दरवर्षी धार्मिक-अध्यात्मिक त्याचबरोबर या पर्यावरणावर आधारित जिवंत देखावा साकारण्यात येतो. खांदेश्वरच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी रांगाच रांगा लागतात. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी फक्त पावणेदोन फुटांची श्रीगणेशाची मूर्ती ठेवण्यात आली आहे. यंदा मंडळाचे चोविसावे वर्ष आहे. सभागृह नेते परेश ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे, खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्याम शिंदे, कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर, निलेश लंके प्रतिष्ठानचे नवी मुंबई संपर्कप्रमुख भाऊ पावडे यांच्यासह गणेश भक्तांनी सामाजिक अंतर राखून खांदेश्वरच्या राजाचे मनोभावे दर्शन घेतले.
यावर्षी विद्युत रोषणाई त्याचबरोबर देखावा साकारण्यात आला नाही. या ठिकाणी गर्दी होऊन कोरोना विषाणू संक्रमण होऊ नये यासाठी मंडळाने हा निर्णय व खबरदारी घेतली. गणेशोत्सवासाठी येणारा खर्च माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार विविध सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी खर्च करण्यात आला. यापुढेही ओमसाई महिला व बाल मित्र मंडळ गरीब गरजूंना मदत करेल.
-सीता पाटील, नगरसेविका, पनवेल महापालिका