Breaking News

बेरोजगारांना सुवर्णसंधी! पनवेलमध्ये 13 जानेवारीला रोजगार मेळावा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय मुंबई विभाग आणि लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 13) सकाळी 10 ते 4 वा. आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील महात्मा फुले सभागृहात बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता उपाायुक्त यांनी ही माहिती दिली.
या रोजगार मेळाव्यात विविध कंपन्याचे प्रतिनिधी त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी पात्र व इच्छूक उमेदवाराच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी हजर राहणार असून या वेळी दहावी पास/नापास, बारावी, आयटीआय, पदवी, पदविका, पदवीधर, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. या रोजगार मेळाव्याच्या दिवशी उपस्थित उद्योजकांच्या आवश्यक शैक्षणिक अर्हतेनुसार (मागणीनुसार) उमेदवारांची निवड केली जाईल.
मेळाव्यात सहभाग घेण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या https://mahaswayam.gov.in या वेबपोर्टलला भेट देऊन व नोंदणी व अद्यावतीकरण करणे आवश्यक आहे. मुलाखतीस येताना स्वतःचा बायोडाटा सर्व शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रासह वरील ठिकाणी उपस्थित रहावे. इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई विभागाचे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता उपाायुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply