पनवेल ः येथील महापालिकेच्या स्वराज्य या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन, योजनांचे भूमिपूजन, विकासकामांचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (दि. 3) सायंकाळी 5.30 वा. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर डॉ. कविता चौतमोल असणार असून नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे व श्रीरंग बारणे, आमदार सर्वश्री प्रशांत ठाकूर, रविशेठ पाटील, महेश बालदी, भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, जयंत पाटील, बाळाराम पाटील, उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर आदी उपस्थित राहणार आहेत. या वेळी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. प्रभाग क्रमांक 14मधील पनवेल महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत ’स्वराज्य’चे बांधकाम करणे, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महाकाली नगर, वाल्मिकी नगर, टपाल नाका, लक्ष्मी वसाहत येथील झोपडपट्टीचा पुनर्विकास, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पटेल मोहल्ला व कच्छी मोहल्ला येथील झोपडपट्टीचा पुनर्विकास, प्रभाग क्र. 16मधील आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र विकसित करणे, प्रभाग क्र. 4मधील खारघर येथे महापौर निवासस्थान बांधकाम, प्रभाग क्र. 7मधील कळंबोली येथे प्रभाग कार्यालय बांधकाम, काळुंद्रे येथे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधणे, प्रभाग क्र. 13मधील जुई गावामध्ये मल:निस्सारण वाहिन्या टाकणे, पम्पिंग स्टेशन बांधणे व मल: प्रक्रिया केंद्र उभारणे, भूखंड क्र. 125मधील सुशोभिकरण केलेले वडाळे तलाव, अंतिम भूखंड क्र. 127 ‘अ’मधील प्राथमिक मराठी कन्या शाळेची इमारत, प्रभाग क्र. 13मधील सुशोभिकरण केलेले जुई गावामधील तलाव, अमृत अभियानांतर्गत पाणी पुरवठा योजनेतून पनवेल येथील मार्केट यार्ड, तक्का रोड, इच्छापूर्ती गणेश मंदिर, हरि ओम नगर, एचओसी. कॉलनी जवळील उभारलेले उंच जलकुंभाचे लोकार्पण होणार आहे.
Check Also
उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन
परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …