Breaking News

लेखा शिक्षण आणि संशोधनाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती

सीकेटी महाविद्यालयात महत्त्वपूर्ण परिसंवाद

पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयातील लेखा विभाग व लेखा आणि वित्त विभाग यांच्या समन्वयाने राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियाना अंतर्गत 6 आणि 7 जानेवारीला डिजिटल युगातील लेखा शिक्षण आणि संशोधन या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे आय.टी.एम. येथील वित्त आणि धोरण अभ्यास केंद्रच्या प्रमुख सनदी लेखापाल डॉ. पिंकी अगरवाल व ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्समधील विभागप्रमुख डॉ.निशिकांत झा उपस्थित होते. तसेच या वेळी संस्थेचे सचिव मा. डॉ. एस. टी. गडदे, प्राचार्य प्रो.डॉ. एस. के. पाटील, वाणिज्य शाखेचे प्रमुख मा. डॉ. एस. बी. यादव ,वाणिज्य विभागाच्या प्रमुख डॉ. एलीझाबेथ मॅथ्युज, आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. बी. डी. आघाव, लेखा आणि वित्त विभागाचे प्रमुख डॉ. एन. इ. कोळी यांनी उपस्थिती दर्शविली. या वेळी पहिल्या सत्रात डॉ. पिंकी अगरवाल यांनी डिजिटल युगात लेखा आणि लेखापरीक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रक्रियेचा वापर, कर आकारणी क्षेत्रात डिजिटलायझेशन, डिजिटल अकाउंटिंगसाठी अकाउंटिंग सॉफ्टवेअर, डिजिटल युगातील लेखा आव्हाने इत्यादी विषयांवर माहिती दिली. तसेच उदयोन्मुख लेखा क्षेत्र , स्थिरता लेखांकन, ग्रीन अकाउंटिंग या बदल माहिती दिली.दुसर्‍या सत्रात डॉ. निशिकांत झा यांनी संशोधन आणि नव उपक्रमाचे महत्त्व, डिजिटल युगातील संशोधन व संशोधन कार्यप्रणाली या बद्दल माहिती दिली. यानंतर 20 सहभागींचे शोध सादरीकरण घेण्यात आले. त्यासाठी परीक्षक म्हणून पिल्लई कॉलेज ऑफ सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स येथील लेखा विभागाच्या प्रा. डॉ. मोनाली रे, डॉ. एकनाथ झरेकर व शंकर नारायण कॉलेज ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड कॉमर्स, भायंदर येथील प्राचार्य डॉ. व्ही. एन. यादव आणि पाठक एच.डी.चे सहाय्यक व्यवस्थापक (लेखापरीक्षण) सनदी लेखापाल कुंदन आंग्रे उपस्थित होते.
या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील यांनी महाविद्यालयाविषयी माहिती दिली व संस्थेचे सचिव मा. डॉ. एस. टी. गडदे यांनी त्यांच्या संबोधनात अकाउंटन्सीमध्ये डिजिटल युगाचे महत्त्व सांगितले तसेच वाणिज्य शाखेचे प्रमुख डॉ. एस. बी. यादव यांनी परिसंवादाचा परिचय करून दिला.या परिसंवादाचे सूत्रसंचालन लेखा आणि वित्त विभागाच्या प्रा. मोनिका भालेराव यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार लेखा आणि वित्त विभागाचे प्रा. मनोज सुपेकर व प्रा. रत्नावली लिमये यांनी मानले.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply