पनवेल ः प्रतिनिधी
वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने पनवेल वाहतूक शाखेच्या हद्दीत नवीन पनवेल सिग्नल येथे संक्रांतीनिमित्त वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे व त्यांच्या सहकार्यांनी रविवार (दि. 15) वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत चालकांमध्ये प्रबोधन करून तिळगूळ वाटप केले.
रस्ता सुरक्षा अभियान 2023 सर्वत्र राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पनवेल शहरातील पंचमुखी सिग्नल, नवीन पनवेल सिग्नल, एचडीएफसी सर्कल व खांदा वसाहत येथे वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत जनजागृती करण्यात आली. रस्ते अपघात वाहतुकीचे नियम न पाळले गेल्याने अनेकांचे जीव गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या सप्ताहामध्ये वाहनचालकांमध्ये वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत वाहतूक शाखेतर्फे पंचमुखी सिग्नल, नवीन पनवेल सिग्नल, एचडीएफसी सर्कल व खांदा वसाहत येथे वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत जनजागृती करण्यात आली. रविवारी नवीन पनवेल सिग्नल येथे वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत चालकांमध्ये प्रबोधन करून तिळगूळ वाटप करण्यात आले.
या वेळी वाहनचालकांना सीट बेल्टचा वापर करणे, हेल्मेट वापरणे, मद्यपान करून गाडी न चालवणे यांसाख्या गोष्टी पथनाट्य आणि फलकांच्या माध्यमातून समजावण्यात आल्या. पनवेल वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे व त्यांचे पथक त्याचप्रमाणे कळंबोली वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक भरत साळुंके व पोलीस उपनिरीक्षक मोहन मुळीक यांनी हेल्मेट वापरासंदर्भात अधिक माहिती देत वाहतुकीचे नियम सर्वानी पाळावे, असे आवाहन केले. या वेळी विद्यार्थी वाहक संस्थेच्या सहकार्याने वाहतूक नियम पाळण्याबाबत चालकांमध्ये प्रबोधन करण्यासाठी रॅलीचे ही आयोजन करण्यात आले होते.
Check Also
पनवेलमधील बेघर निवारा प्रकल्पाची महापालिका सदस्यांकडून पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या वतीने सेक्टर १२, प्लॉट क्रमांक २ए येथे उभारण्यात येत असलेल्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper