खारघर : रामप्रहर वृत्त
रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडेन्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ’खारघर मॅरेथॉन 2023’ च्या अनुषंगाने खारघर येथे रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात एकपात्री अभिनय व भित्तिपत्रक तसेच ब्लॉग लेखन स्पर्धा पार पडल्या.एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये राजश्री सुर्वे यांनी प्रथम क्रमांक, शिवांशू काळे द्वितीयतर प्रगती मिश्रा हिने तृतीय क्रमांक पटकाविले तसेच भीती पत्रक स्पर्धेमध्ये शिवानी कुमारी प्रथम क्रमांक, चेतन तामखाने याने द्वितीय क्रमांक तर साक्षी पाटील व मेहेर हमीद खान यांनी तृतीय क्रमांक पटकाविले. याचबरोबर ब्लॉग लेखन स्पर्धेमध्ये सुमारे 26 स्पर्धकांनी भाग घेतला होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड व रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निशा नायर यांनी या स्पर्धामध्ये स्पर्धकांना भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले तसेच स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या सर्व विजेत्यांना 22 जानेवारी रोजी खारघर मॅरेथॉन 2013 स्पर्धेच्या दिवशी पारितोषिके तसेच प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …