Breaking News

उरण महोत्सव नागरिकांसाठी पर्वणी -लोकनेते रामशेठ ठाकूर

उरण : प्रतिनिधी
एक विकसित शहर अशी ओळख निर्माण करू पाहणार्‍या उरणमध्ये आगरी, कोळी आणि कराडी समाजांबरोबरच विविध जाती-धर्मांचे लोक वास्तव करीत आहेत. अशा सर्व लोकांच्या पारंपरिक संस्कृतीचे जतन करण्याचे काम महेश बालदी मित्र मंडळाच्या माध्यमातून उरण महोत्सव करणार आहे. त्यामुळे हा महोत्सव येथील नागरिकांसाठी पर्वणी असल्याचे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. ते गुरुवारी (दि. 19) उरण महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते.
महेश बालदी मित्र मंडळ, वूमन ऑफ विस्डम, स्टेप आर्ट कला, क्रीडा, शैक्षणिक आणि सामाजिक संस्था, स्टॉर्म फिटनेस आणि मिक्स मार्शल आर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने उरण कोटनाका मैदानात 19 ते 22 जानेवारीदरम्यान उरण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले.
या वेळी आमदार महेश बालदी, सिने अभिनेत्री सविता मालपेकर, अभिनेत्री दिव्या पुरगावकर, विद्या म्हात्रे, भाजप तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ घरत, उद्योगपती पंडित घरत, शहराध्यक्ष कौशिक शाह, महिला अध्यक्ष राणी म्हात्रे, भाजप तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, संपदा थळी, महोत्सवाचे आयोजक पप्पू सुर्यराव यांच्यासह आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
उरण महोत्सवाचे आयोजन हे पप्पू सुर्यराव यांनी महेश बालदी मित्र मंडळाच्या माध्यमातून अवघ्या पाच दिवसांच्या कालावधीत केले आहे. या महोत्सवाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन ही उरणकरांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. आज उरणच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून जवळजवळ 150 ते 400 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे, तसेच कर्नाळा पक्षी अभायारण्याच्या अत्याधुनिक सुशोभीकरणासाठी राज्य सरकारकडून भरीव तरतूद करण्यात येणार असल्याने भविष्यात निश्चित या अभयारण्यात पर्यटकांचा ओढा वाढणार आहे, असे आमदार महेश बालदी यांनी नमूद करीत आपल्या भाषणातून उरण महोत्सवाचे आयोजक पप्पू सुर्यराव व त्यांच्या सहकार्‍यांचे कौतुक केले.
उरण परिसराचा चेहरामोहरा बदलत आहे. त्याचे संपूर्ण श्रेय हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी यांना जाते. आज उरण नगरीतील विविध जाती-धर्मांच्या लोकांसाठी महोत्सवाचे आयोजन हे महेश बालदी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. या महोत्सवातून आपल्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन होणार असून विविध पदार्थांचा आस्वादही घेता येणार आहे, असे सिने अभिनेत्री सविता मालपेकर म्हणाल्या.
या वेळी मान्यवरांच्या हस्ते उरण तालुक्यातील कलाकार, गायक, चित्रकार, शिवप्रेमींचा सन्मान करण्यात आला.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply