Breaking News

रायगडचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. योगेश म्हसे यांची नियुक्ती

अलिबाग : रायगड जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. योगेश म्हसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. योगेश म्हसे हे म्हाडाचे कार्याधिकारी म्हणून कार्यरत होते, तसेच मार्केटिंगचे महाव्यवस्थापक म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे.
आताचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची कोकण विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या पदावर डॉ. म्हसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. योगेश म्हसे यांची भिवंडी निजामपूर मनपा आयुक्त, पिंपरी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द विशेष गाजली होती.
डॉ. योगेश म्हसे यांनी त्यांच्या कार्यकाळात भिवंडीत विविध सामाजिक उपक्रम पार पाडले. करवसुली, अनधिकृत बांधकाम आदि कारवायांमुळे ते विशेष चर्चेत आले. आता रायगड जिल्ह्याचा कारभार स्वीकारल्यानंतर ते कशाप्रकारे काम करतात, प्रलंबित प्रश्न कसे सोडवतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply