Monday , January 30 2023
Breaking News

रिक्षाने घेतला अचानक पेट

दोन जण जखमी
नवी मुंबई : बातमीदार
महापे-शीळफाटा मार्गावर ठाकुर पाडा येथील सीएनजी पंपावर सीएनजी भरण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या रिक्षाने अचानक पेट घेतल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजता घडली आहे. रांगेत उभ्या असलेल्या एका गॅस बाटल्यात काही बिघाड होता. त्यामुळे त्या रिक्षाचालकाने हाताने गॅस सोडण्याचा प्रयत्न केला आणि अचानक पेट घेतला. त्यामुळे रिक्षाने पेट घेतला. या रिक्षाला लागलेल्या आगीची झळ दुसर्‍या रिक्षालादेखील बसल्याने या आगीत दोन रिक्षा जळून खाक झाल्या. यात मागील रिक्षा चालकाचा हात किरकोळ भाजला असून त्याची पत्नीदेखील भाजली आहे. रिक्षा चालकाने वेळीच पत्नीला बाहेर खेचल्याने मोठा अनर्थ टळला, अशी माहिती जखमी रिक्षाचालक सर्फराज शेख यांनी दिली.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply