Breaking News

भाताण बोगद्यानजीक सहा जणांच्या टोळीने एकास लुटले

पनवेल : वार्ताहर
पनवेल तालुक्यातील मुंबई – पुणे एक्स्प्रेस हायवेवर भाताण बोगद्याच्या अगोदर सहा जणांच्या अज्ञात टोळीने एका व्यक्तीस लाखो रुपयाला लुटल्याची घटना घडली आहे.
आजिनाथ राख (वय 37) हे पहाटेच्या सुमारास त्यांच्या ताब्यात असलेल्या मारुती सुझुकी झेन एस्टिलो गाडी (एमएच 43 एएल 3055) या गाडीतून ठाणे बाजूकडून पुणे बाजूकडे जात हाते. या वेळी अचानक पणे पनवेलजवळील कि. मी. नंबर 11. 00 या ठिकाणी त्यांच्यामागे आलेल्या एर्टिगा गाडीतील अनोळखी सहा इसमांनी त्यांच्या गाडीला ठोकर मारल्याचा बहाणा करून त्यांची गाडी जबरदस्तीने थांबवली. त्यानंतर आजिनाथ यांना मारहाण करून खालापूर फूड मॉल येथे जबरदस्तीने घेऊन जाऊन त्यांच्या गाडीत असलेली एक लाख 97 हजार रुपये व ओपो कंपनीचा मोबाईल फोन व इतर ऐवज असा मिळून जवळपास दोन लाख 17 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरला.
या प्रकारानंतर गाडी तेथेच सोडून ती टोळी पसार झाली. या बाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply