मुंबई : केंद्र सरकारने मर्यादित स्वरूपात विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, सोमवार (दि. 25)पासून देशांतर्गत प्रवासी विमान वाहतुकीला सुरुवात होत आहे. त्यानुसार मुंबई विमानतळावरून विमान वाहतूक सुरू होणार असून, दररोज 25 विमाने उतरणार व तितकीच उड्डाण करणार आहेत. चौथ्या लॉकडाऊनची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यातून अनेक सेवा आणि व्यवहारांना शिथिलता देण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यानंतर एनडीआरएफने याविषयीची नियमावली जारी केली होती. यात विमानसेवा बंद राहील, असे म्हटले होते, पण सरकारने निर्णयात फेरबदल करीत मर्यादित स्वरूपात देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारनेही मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली आहे.
Check Also
सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …