Tuesday , March 28 2023
Breaking News

पनवेलमध्ये बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

शहर वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम

पनवेल : वार्ताहर

नो एंट्रीत प्रवेश करणे, सीटबेल्ट, काळ्या काचा व हेल्मेट न वापरणार्‍यांविरुद्ध पनवेल शहर वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे हे स्वतः रस्त्यावर उतरत कारवाईची धडक मोहिमेला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर अगामी काळात मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती पनवेल शहर वाहतूक शाखेकडून देण्यात आली. राज्यात हेल्मेट सक्ती मोठ्या प्रमाणात गाजत आहे. मोठमोठ्या शहरात याबाबत अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात प्रबोधन आणि जनजागृती करण्यात येत आहे. परिसरात आता दुचाकीस्वार हेल्मेट घालूनच प्रवास करीत आहेत. काही अपवाद वगळता हेल्मेट न चुकता घातले जात आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वाहतुक शाखेने बिगर हेल्मेटविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. वास्तविक पाहता हेल्मेट घालणे हे दुचाकी स्वाराच्या फायद्याचे आहे. यामुळे कित्येकदा अपघातात प्राण वाचतात याचे कारण म्हणजे डोक सुरक्षित राहते त्याला मार लागत नाही. असे असतानाही काही दुचाकीस्वार हेल्मेट घालत नसत त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई पनवेल शहर वाहतूक शाखेने केली आहे. या वेळी नो एंट्रीत प्रवेश करणे, चारचाकी वाहनांना काळ्या काचा, सीटबेल्ट, ट्रिपल शिट, अशी धडक मोहीम राबविण्यात  आली आहे. या वेळी पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी पनवेल परिसरात रस्त्यावर उतरून कारवाई करीत असल्याने कोणाचीही गय केली गेली नाही. कर्मचार्‍यांनाही हेल्मेट न वापरणार्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आम्ही सीटबेल्ट न वापरणे, काळ्या काचा, नो एंट्रीत प्रवेश करणे, विना हेल्मेट चालणार्‍या वाहनचालकांवर कारवाईची विशेष मोहीम हाती घेतली आहे. एका दिवसात 418 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच याबाबत जनजागृतीही करण्यात आली. त्याचा परिपाक म्हणजे हेल्मेट वापरणार्‍यांची संख्या कमालीची वाढली आहे. त्यामध्ये आनखी भर पडेल असा विश्वास आम्हाला वाटतो.

-संजय नाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शहर वाहतुक शाखा

 

बेकायदा प्रवासी वाहतूक करणार्‍या 50 इको चालकांवरही गुन्हे दाखल

खारघर : प्रतिनिधी

क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतुक, वाहतूक नियमांचे उल्लंघन, इतर वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या इकोचालकांवर खारघर वाहतुक शाखेने शनिवारी (दि.4) कारवाई करत गुन्हे दाखल केले. खारघर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. खारघर वाहतूक शाखे अंतर्गत खारघर रेल्वे स्टेशन ते तळोजा यादरम्यान प्रवासी वाहतूक करणारे इको चालकांवरही कारवाई करण्यात आली. या मार्गावर नवी मुंबई मेट्रो धावणार आहे. मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात आहे, मात्र स्टेशनवरून तळोजा कडे जाणार्‍या बससेवा अपुरी आहे. इतर प्रवासी सेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होते. नाईलाजास्तव इको चालकांचा आधार या प्रवाशांना घ्यावा लागतो. काही इको चालक याचा फायदा घेत मनमानी पध्द्तीने प्रवाशांकडून भाडे उकळतात.

पोलिसांकडून सक्त ताकीद

खारघर वाहतुक शाखेच्या माध्यमातुन बेलपाडा टॅक्सी स्टॅन्ड आणि आरएफ तळोजा येथील टॅक्सी स्टँडवर जाऊन इको चालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. इकोचालकांची मनमानी, बेशिस्त वर्तन खपवून घेण्यात येणार नाही, अशी सक्त ताकीद खारघर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश गावडे यांनी दिली.

Check Also

30 मार्चपासून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला प्रारंभ

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचाही प्रत्यक्ष सहभाग नागपूर : प्रतिनिधी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून …

Leave a Reply