Breaking News

खांदा कॉलनीत एसबीपीएल रंगली

रत्नदीप स्पोर्ट्स क्लब विजेता

पनवेल : रामप्रहर वृत्त
स्व. नगरसेवक संजय भोपी यांच्या संकल्पनेतून साकारलेली आणि वयाची चाळीशी ओलांडलेल्या क्रिकेटपटूंसाठी असणारी संजय भोपी प्रीमियर लीग (एसबीपीएल) क्रिकेट स्पर्धा रविवारी (दि. 5) खांदा कॉलनी सेक्टर 8 येथील महात्मा स्कूलच्या मैदानात रंगली. या स्पर्धेत माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे यांच्या रत्नदीप स्पोर्ट्स क्लब, धाकटा खांदा या संघाने सलग चौथ्यांदा विजेतेपद पटकाविले.
संजय भोपी सोशल क्लब, आनंदी ग्रुप, मॉर्निंग योगा ग्रुप व अलर्ट सिटीझन फोरम यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. उद्घाटन समारंभास माजी नायब तहसीलदार संजीव मांडे, बी. जी. शिर्के ग्रुपचे नवी मुंबई प्रमुख सुनील श्रीखंडे, सीमा शुल्क विभाग अधिकारी संजय वैद्य, महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय पाटील आदी उपस्थित होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मैदानात उतरून फलंदाजी करीत क्रिकेट खेळाचा आनंद लूटला.
स्पर्धेस भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सदिच्छा भेट दिली. युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, ओबीसी मोर्चा उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप सोबत होते.
स्पर्धेत अलर्ट सिटीझन फोरम संघाने द्वितीय, श्री गणेश इलेव्हन संघाने तृतीय व श्री गणेश प्लाझा संघ बी 2 संघाने चतुर्थ क्रमांक प्राप्त केला. मालिकावीर आनंद माळी, उत्कृष्ट फलंदाज अर्जुन सिंग, उत्कृष्ट गोलंदाज महेश शिगवण, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्ञानेश्वर कचरे आणि शिस्तबद्ध संघ म्हणून श्री गणेश प्लाझा बी 2ची निवड करण्यात आली. विजेते संघ आणि वैयक्तिक उल्लेखनीय कामगिरी बजावणार्‍या खेळाडूंना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
पारितोषिक वितरण समारंभाला भाजप पनवेल शहर सरचिटणीस व माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, अजय बहिरा, भाजप शहर सरचिटणीस अमरीश मोकल आदी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संजय भोपी सोशल क्लब, आनंदी ग्रुप, मॉर्निंग योगा ग्रुप व अलर्ट सिटीझन फोरमचा पदाधिकारी, सदस्यांनी परिश्रम घेतले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply