Breaking News

घरून मतदान करण्याची सोय असावी -नाना पाटेकर

मुंबई : प्रतिनिधी

देशासह राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर परखडपणे मत मांडणारे अभिनेते नाना पाटेकर यांनी निवडणूक मतदान आणि राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या मुद्द्यावर रोखठोक मत मांडलं आहे. मतदानाला गर्दी कमी आहे. हे चांगलं नाही. सरकारनं मतदानाची सक्ती करावीच, पण घरी बसून मतदान करण्याची सोय करायला हवी, असं ते म्हणाले. दादरमधील मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर ते बोलत होते. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राज्यातील दिग्गज नेत्यांसह मुंबईतील सेलिब्रिटींनीही मतदानाचा हक्क बजावला. अभिनेते नाना पाटेकर यांनीही दादर येथील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. सामाजिक मुद्द्यांवर नेहमीच परखडपणे भाष्य करणार्‍या नानांनी या वेळी निवडणूक मतदान आणि राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या पद्धतीवर रोखठोक मत मांडले. सकाळी मतदान केंद्रावर गर्दी कमी होती. ही बाब त्यांना खटकली. मतदारांनी असं करू नये. हे चांगलं नाही. मतदानाची सक्ती केल्यानंतरच तुम्ही मतदान कराल का, असा सवालही त्यांनी या वेळी केला. ’सरकारने मतदानासाठी सक्ती केलीच पाहिजे, पण त्याचबरोबर घरून मतदान करता येईल अशी सोय केली पाहिजे. आता त्यासाठी यंत्रणा कशी असेल हे मला माहिती नाही,’ असेही शेवटी नाना पाटेकर म्हणाले.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply