Monday , January 30 2023
Breaking News

भगवद्गीता पठण स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे सुयश

पनवेल ः रामप्रहर वृत्त

खारघर येथे चिन्मय मिशन मुंबई तर्फे भगवद्गीता पठण 2019 च्या नवी मुंबई विभागीय स्तर स्पर्धा रविवारी (दि.8) झाल्या. यात विद्यार्थ्यांना भगवद्गीता अध्याय-18, श्लोक-40-78 पठणासाठी दिले होते. या स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उज्ज्वल यश संपादन केले.

 वरील स्पर्धेत ग्रुप-ए  (नर्सरी,ज्यनिअर व सि.के.जी.) मध्ये श्रीनाथ के.आर गुरूप्रसाथ सुधारामन याला सि.के.जी.ई प्रथम क्रमांक, मोहम्मद अर्श शेख बिलाल सिकेजीजी तृतीय क्रमांक,

ग्रुप-बी (ई.1ली.ते2री.) मध्ये विस्मया सुभाष काबनूर तृतीय क्रमांक, वर्धन अविनाश खांडेकर उत्तेजनार्थ, ग्रुप डी-(ई.5वी.ते6वी) मध्ये शरद सुभाष काबनूर उत्तेजनार्थ, ग्रुप-ई

(ई.7वी ते8वी) मध्ये वरद अविनाश खांडेकर याला उत्तेजनार्थ असे क्रमांक विद्यार्थ्यांनी प्राप्त केजे आहे.  वरील विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणार्‍या संगीत  शिक्षकांचे, संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व शाळेच्या  मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply