Breaking News

आव्हाडांनी माफी मागावी; अन्यथा भाजपचे आंदोलन

पनवेल : वार्ताहर
जितेंद्र आव्हाड त्वरित माफी मागा; अन्यथा भाजप युवा मोर्चा राज्यभर औरंगजेबधार्जिण्या आव्हाड यांचे पुतळे जाळून निषेध आंदोलन करणार, असा इशारा भाजपचे महाराष्ट्र सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज उभ्या महाराष्ट्राची अस्मिता आहेत आणि जितेंद्र आव्हाडसारखी औरंगजेब आणि शाहिस्तेखानाची पिलावळ जर महाराजांचा असा अपमान करणार असेल तर भाजप हे मुळीच खपवून घेणार नाही. जितेंद्र आव्हाड हे जाणीवपूर्वक वारंवार ठरवून करीत आहेत हे महाराष्ट्राला कळून चुकले आहे आणि आता ते शिवप्रेमींच्या भावनांचा अंत पाहत आहेत.जितेंद्र आव्हाड यांनी या विषयात त्वरित माफी मागावी; अन्यथा युवा मोर्चा राज्यभर औरंगजेबधार्जिण्या आव्हाड यांचे पुतळे जाळून निषेध आंदोलन करेल आणि आव्हाडांनी जर अशी नालायकपणाची वक्तव्य त्वरित थांबवली नाहीत, तर औरंगजेबाच्या या पिलावळीला युवा मोर्चा महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असे पाटील यांनी म्हटलेय.

Check Also

राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …

Leave a Reply