Breaking News

चिरनेरमधील मूर्तिकार संतप्त; विद्युत कामांसाठी विजेचा खोळंबा

चिरनेर : रामप्रहर वृत्त

उरण तालुक्यातील चिरनेर परिसरात वीज समस्येचा प्रश्न गंभीर होत आहे. सातत्याने खंडित होणारा वीजपुरवठा वाढीव बिले आदी तक्रारी व समस्यांनी ग्राहक बेजार झाले आहेत. अशातच गणेश उत्सव अगदी तोंडावर आला असतांना, गणेश मूर्तींचे रंगकाम करण्यासाठी वीजेचा सारखा लंपडाव सुरू असल्यामुळे येथील मुर्तीकारांसमोर मोठा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.

गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवर म्हणजे येत्या 22 ऑगस्टला येवून ठेपला असतांना, मूर्तिकारांना विजेच्या समस्येमूळे रंगकाम करण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे अशीच वीजेची गायब होण्याची समस्या कायम राहिल्यास गणेश मुर्तीचे रंगकाम कसे पूर्ण करता येईल, असा गंभीर समस्येचा मोठा प्रश्न मूर्तिकारांसमोर उभा राहीला आहे. त्यामुळे चिरनेर कलानगर येथील मूर्तिकारांनी विद्युत मंडळाच्या भोंगळ कारभाराबद्दल संताप व्यक्त केला असून, मुर्तीकार संदेश चौलकर, सुनिल चौलकर, भाई चौलकर, नंदकुमार चिरनेरकर, प्रसाद चौलकर, गजानन चौलकर, नरेश हातनोलकर, अभिजित चिरनेरकर, जिवन चौलकर, विलास हातनोलकर, भालचंद्र हातनोलकर, चेतन चौलकर, अमित चिरनेरकर, दिपक म्हसिलकर, कुणाल चिरनेरकर, प्रकाश चिरनेरकर, नारायण चिरनेरकर, आदींनी विज मंडळाच्या गलथान कारभारा विरोधात निषेध व्यक्त केला आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply