Tuesday , March 28 2023
Breaking News

तक्रारींचा आढावा पहिल्या सोमवारी घेणार : जिल्हाधिकारी

45 दिवसांत निपटारा केला जाईल!
अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. येथे मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्याची निवेदने स्वीकारली जातील. 45 दिवसांमध्ये या तक्रारींचा निपटारा केला जाईल. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी सर्व अधिकार्‍यांची बैठक घेऊन या तक्रारींचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यावेळी उपस्थित होत्या.रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात 20 डिसेंबर 2022 रोजी मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करण्यांत आलेली आहे. मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे पदसिध्द विशेष कार्यअधिकारी म्हणुन निवासी उपजिल्हाधिकारी रायगड यांची नियुक्ती करण्यांत आली असुन सदर कक्षात एक नायब तहसिलदार व दोन अव्वल कारकुन यांची नियुक्ती करण्यांत आलेली आहे.
जिल्हा स्तरावरील मुख्यमंत्री सचिवालयाकडे प्राप्त होणारे अर्ज, निवेदने यावर शासनस्तरावर कार्यवाही होणे आवश्यक असल्यास ती त्वरीत मुख्यमंत्री सचिवालयाकडे पाठविण्यांत येतील. ज्या अर्ज, निवेदनावर क्षेत्रीय कार्यालयाकडुन कार्यवाही होणे आवश्यक असल्यास ती संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवून जास्तीत जास्त 45 दिवसांच्या विहीत मुदतीत निर्गमीत करण्यांत येतील. जिल्हा स्तरावरील मुख्यमंत्री सचिवालयाकडे प्राप्त होणा-या अर्ज, निवेदनावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाच्या दिवशी आढावा घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी सांगितले.पर्यटन, जलजीवन , शहरीकारणामुळे उद्भवणार्‍या समस्या, रायगड किल्ला या कामाना प्राधान्य देण्यात येईल. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम लवकरच सुरु केले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी दिली.

रायगड जिल्ह्यातील ज्या नागरीकांना, लोकप्रतिनिधींना त्यांच्या अडीअडचणी, समस्याबाबत मुख्यमंत्र्याना उद्देशून अर्ज, निवेदने, तक्रारी देण्याचे असल्यास त्यांनी ती मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नावे जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे स्थापित करण्यात आलेल्या जिल्हा स्तरावरील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाकडे सादर करावीत.
– डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी, रायगड

Check Also

30 मार्चपासून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला प्रारंभ

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचाही प्रत्यक्ष सहभाग नागपूर : प्रतिनिधी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून …

Leave a Reply