Breaking News

रायगड जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा

पनवेल : बातमीदार

लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनतर्फे जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या

स्पर्धेत 260 स्पर्धकांनी सहभाग घेत उत्तम प्रतिसाद दिला.

नवीन पनवेल येथील सिडको समाज मंदिरात झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मनेश्वर नायक यांच्या हस्ते झाले, तर बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून विजय पाटील उपस्थित होते.

स्पर्धेसाठी रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष संजय कडू, लायन्स क्लब ऑफ पनवेलचे प्रोजेक्ट चेअरमन राजेंद्र जेसवानी, अशोक गिल्डा, नागेश देशमाने, सचिव ज्योती देशमाने यांचे सहकार्य लाभले.

लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने टेटे क्रीडाप्रकाराच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारे सातत्याने स्पर्धा आयोजित केली जाते.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply