पनवेल : रामप्रहर वृत्त
तिरंगा महोत्सव हा पनवेल महानगरपालिकेचा महत्त्वपूर्ण, असा स्तुत्य उपक्रम असल्याचे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी तिरंगा महोत्सवावेळी काढले. पनवेल महानगरपालिकेमार्फत आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात तिरंगा महोत्सवाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महानगरपालिकेचे वतीने यावेळी फाळणी दु:खत दिनाचे छायाचित्र प्रदर्शन, तिरंगा राष्ट्रध्वज माहितीचे प्रदर्शन, भव्य तिरंगा रांगोळी, तिरंगा सेल्फी बूथ, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा देशभक्तीपर गीतांचा भारत गौरव गाथा सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
देशासाठी बलिदान स्वीकारलेल्या स्वातंत्र्यसेनानींच्या 12 वारसदारांचा सन्मान सत्कार आमदार महोदयांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. तसेच पनवेल अग्निशमन दलाच्या फायरमन शुभांगी घुले यांनी अमेरिकेत जागतिक स्पर्धेत सिल्वर आणि ब्रांझ मेडल मिळवून पनवेल मनपाचे आणि देशाचे नाव जागतिक पातळीवर नेले, त्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
या वेळी आमदार विक्रांत पाटील, पनवेल परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते,उपायुक्त प्रसेनजीत कारलेकर, मंगला माळवे, स्वरूप खारगे, अभिषेक पराडकर,मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, लेखा अधिकारी डॉक्टर व्होरकाटे, सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार, शहर अभियंता संजय कटेकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी, शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर राजू पाटोदकर, नगररचना विभागाच्या अंकिता नेरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी सादर झालेल्या भारताची गौरवगाथा देश प्रेमाच्या स्वर लहरी या सांस्कृतिक कार्यक्रमाने अधिक रंगत आणली.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …
RamPrahar – The Panvel Daily Paper