लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त
मुंबई महानगर क्षेत्रातील मराठा उद्योजकांच्या व्यवसायांची ब्रॅन्डींग आणि समाजाशी बॉन्डींग करण्यासाठी मराठा महामेळावा कामोठे येथे आयोजित करण्यात आला आहे. अस्तित्वाची जाण आणि आत्मभान देणारा हा महामेळावा 10 ते 19 फेब्रुवारी यादरम्यान कामोठे येथील पोलीस स्टेशन ग्राऊंडवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून होणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या उपस्थितीत झाले. एम्पॉवर सामाजिक विकास मंडळाच्या (एम्पॉवर-मराठ्यांचे महाकुटूंब) वतीने कामोठे येथे मुंबई महानगर क्षेत्रातील मराठा उद्योजकांसाठी ‘मराठा महामेळावा’ कामोठेमध्ये आयोजीत करण्यात आला आहे. या मेळाव्यात 10 ते 19 फेबु्रवारी दरम्यान मराठ्यांची शौर्यगाथा, व्याख्यान सांस्कृतिक कार्यक्रम, महिला मेळावा, कीर्तन सेवा, बाळ मेळावा, युवा झेप, उद्योग नगर, प्रशासकीय सेवा सन्मान सोहळा आणि 19 फेब्रुवारी या शेवटच्या दिवसी शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. या मेळाव्याच्या उद्घाटनावेळी भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेवक विजय चिपळेकर, माजी नगरसेविका हेमलता गोवारी, युवानेते हॅप्पी सिंग, सुलक्षणा जगदाळे, बाळासाहेबांची शिवसेनेचे महानगर संपर्क प्रमुख रामदास शेवाळे, भाऊ भगत, दामोदार चव्हाण, शहाजी भोसले, युवामोर्चा कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठा बाधंब अणि उद्योजक उपस्थित होते.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …