मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष अणि विकास हे एक समीकरण बनले आहे. त्यानुसार पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासाची कामे सुरू आहेत. पनवेल तालुक्याती ग्रुप ग्रामपंचायत पालीदेवद हद्दीत विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आला.
पालीदेवद (सुकूपर) ग्रामपंचायतीमधील प्रभाग क्रमांक 4 येथे जि. प मराठी शाळेचे बांधकाम करणे, प्रभाग क्रमांक 6 येथे शासनाच्या जनसुविधा योजनेंतर्गत 18 लाख नऊ हजार 929 रुपयांच्या निधीतून डंपिंग ग्राऊंड येथे घनकचरा व्यवस्थापन करणे, याच प्रभागात जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2022-23च्या आठ लाख 50 हजार रुपयांच्या निधीतून विमलवाडी अंगणवाडीच्या नवीन इमारतीचे बांधकाम करणे, प्रभाग क्रमांक 2 येथे 15वा वित्त आयोगनुसार सात लाख आठ हजार 401 रुपयांच्या निधीतून कांडपिळे पेट्रोल पंप ते घाटी आळीपर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे, याच प्रभागात 15वा वित्त आयोगनुसार सात लाख 53 हजार 783 रुपयांच्या निधीतून भगतवाडी येथील प्रेमनगरी बैठक हॉल ते एक्सप्रेस हायवेपर्यंत अंतर्गत गटार बांधकाम करणे, प्रभाग क्रमांक 5 येथे 15वा वित्त आयोगनुसार सात लाख रुपयांच्या निधीतून सिंडीकेट बँक ते गोकुळधाम सोसायटीपर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे, प्रभाग क्रमांक 4 येथे 15वा वित्त आयोगनुसार चार लाख रुपयांच्या निधीतून नामदेव पोपेटा ते जगदीश पोपेटा घर अंतर्गत गटार बांधकाम व दुरुस्ती करणे, याच प्रभागात 15वा वित्त आयोगनुसारचार लाख रुपयांच्या निधीतून जयवंत पोपेटा ते रामदास पोपेटा घरापर्यंत गटार बांधकाम व दुरुस्ती करणे, प्रभाग क्रमांक 1 येथे जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2022-23च्या 10 लाख रुपयांच्या निधीतून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता तयार करणे. या सर्व विकास कामांचे भूमिपूजन महाशिवरात्रीचे औचित्य साधून करण्यात आले.
या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह, तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, माजी जि. प. सदस्य अमित जाधव, बॉम्बे राऊंड टेबल 19चे चेअरमन विनय महेश्वरी, उद्योजक विनय अग्रवाल, पनवेल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी सीताराम मोहिते, भाजप पालीदेवद जि. प. अध्यक्ष किशोर सुरते, सरपंच योगिता राजेश पाटील, उपसरपंच दिवेश भगत, माजी उपसरपंच आलुराम केणी, बुवाशेठ भगत, अशोकशेठ पाटील, भाजप सुकापूर अध्यक्ष राजेश पाटील, सरचिटणीस उदय म्हस्कर, पालीदेवद ग्रामपंचायतीचे सदस्य महेश पाटील, पुष्पा म्हस्कर, अनिता पाटील, चेतन केणी, युवा नेता प्रमोद भगत, रवींद्र केणी, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष महेश केणी, माजी ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटील, ज्येष्ठ नेते आत्माराम पाटील, ग्रामविकास अधिकारी सुदीन पाटील, भाजप महिला मोर्चा तालुका चिटणीस प्रिया वाघमारे, हनुमंत खुटले आदी गावातील सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते, ग्रामस्थ, युवा कार्यकर्ते, ग्रामपंचायत कर्मचारी, शाळेचे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.