Breaking News

समरभूमी उंबरखिंडीत विजय दिन उत्साहात

हजारो शिवप्रेमींची उपस्थिती

खोपोली ः प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज, सरनौबत नेताजी पालकर आणि मावळ्यांनी मोगलांवर मिळविलेला ऐतिहासिक 359वा विजय दिन खालापूर तालुक्यात खोपोली-पाली मार्गावर चावणी ग्रामपंचायत हद्दीत समरभूमी उंबरखिंडीत रविवारी (दि. 2) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी जय जिजाऊ जय शिवराय आणि तुतारीच्या निनादाने उंबरखिंडीचा परिसर शिवमय झाला होता. खालापूर पंचायत समिती, शिवदुर्ग मित्रमंडळ लोणावळा, चावणी ग्रामपंचायत आणि सरनौबत नेताजी पालकर सीनियर ग्रुप  चौक यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नेताजी पालकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौक गावातून मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. चौकमधील सामाजिक कार्यकर्ते सुधीर ठोंबरे, संजय कोंडीलकर, अ‍ॅड. मिलिंद सुरावरकर यांसह विद्यार्थी व शेकडो चौक ग्रामस्थांच्या उपस्थितीत मशाल रॅलीला सुरुवात झाली. ढोल, लेझिम आणि आणि बाल मावळ्यांच्या निघालेल्या शोभायात्रेमुळे चौक गाव पूर्णपणे शिवमय झाले होते. उंबरखिंडीत ऐतिहासिक लढाईच्या विजयाचे प्रतीक म्हणून उभारण्यात आलेल्या विजय स्तंभाचे दर्शन घेण्यासाठी खालापूर, पनवेल, पेण, कर्जतसह मावळ प्रातांतूनदेखील हजारो तरुण आले होते. समरभूमीत शिवचरित्र व्याख्यान, पोवाडे, तलवारबाजी प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply