Breaking News

काळ्या काचा बसवणार्‍यांवर वाहतूक पोलिसांची कारवाई

एका दिवसात 76 चालकांकडून दंड वसूल
पनवेल ः वार्ताहर
चारचाकी वाहनांच्या कांचावर बसवलेल्या काळ्या फिल्मविरोधात पनवेल शहर वाहतूक पोलिसांनी उघडलेल्या धडक मोहिमेंतर्गत एका दिवसात 76 गाड्यांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही करवाई करण्यात येत असल्याची माहिती पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांनी दिली. चारचाकी गाड्यांच्या बाजूच्या काचा 50 टक्के व मागच्या बाजूची काच 70 टक्के पारदर्शक असावी, असे मोटार वाहन कायद्यात नमूद करण्यात आले आहे, मात्र सर्रासपणे याहून अधिक काळ्या फिल्मच्या काचा बसविण्यात येत असल्याची बाब वारंवार समोर येत असते. याबाबत चारचाकी गाड्यांच्या काचांना कोणत्याही प्रकारची फिल्म लावू नये, असे न्यायालयाने दिले होते. त्यानुसारच आजपर्यत या वाहनावर कारवाई सुरूच आहे. एका दिवसात धडक मोहीम पनवेल शहरात राबवून, या कारवाईत 76 वाहनांवर कारवाई केली. त्यानुसार त्यांच्याकडून चार हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांनी दिली.

विक्रेत्यांवरही कारवाईचा बडगा
वाहनांच्या काचांवर काळ्या फिल्म बसवणार्‍या विक्रेत्यांवरही आरटीओने आता कारवाईचा बडगा उगारणार आहे, तसेच उत्पादकांनीही वाहनांचे उत्पादन करताना पारदर्शक काचा बसवाव्यात, अशा सूचना पनवेल आरटीओ कार्यालयातून करण्यात आल्या आहेत. वाहनांची नोंदणी व नूतनीकरण करताना काळ्या फिल्म आढळल्यास त्या त्वरित काढून टाकण्यात येणार आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply