आरपीआय आठवले गटाची मागणी
कर्जत : प्रतिनिधी
कर्जत शहरातील सरकारी दवाखाना जवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक परिसरातील परिस्थितीची माहिती असायला हवी यासाठी कर्जत पोलीस दलाने तेथे सीसीटिव्ही कॅमेरे लावावेत, अशी मागणी आरपीआय आठवले गटाचे विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष किशोर गायकवाड यांनी लेखी निवेदन देवून केली आहे. कर्जत येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असलेल्या चौकात पालिका किंवा पोलीस दलाकडून त्या भागातील हालचाली यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटिव्ही कॅमेरे नाहीत. भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तेथे सीसीटिव्ही कॅमेरे यांचे जाळे असावे अशी मागणी आरपीआय यांच्याकडून करण्यात आली आहे. तशा आशयाचे निवेदन पक्षाच्या आठवले गटाचे विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष किशोर गायकवाड यांनी पोलिसांकडे दिले आहे. कर्जत पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक उदय सुर्वे यांनी निवेदन स्वीकारले आहे. यावेळी आरपीआयचे उदय जाधव, अशोक गायकवाड, विजय जाधव, संतोष जाधव आदी उपस्थित होते. कर्जत शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरु असते. त्यामुळे अवजड वाहने या मार्गावरुन ये-जा करत असतात. सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यामुळे या वाहनांवर लक्ष ठेवणेही सोपे जाणार आहे.