खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात सोमवारी (दि.27) स्टाफ वेल्फेअर कमिटीच्या तर्फे मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध मराठी कवी आणि लेखक विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा केला जातो. कुसुमाग्रज हे मराठी साहित्यातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व होते आणि त्यांनी महाराष्ट्राच्या भाषा आणि संस्कृतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. प्रस्तुत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रुपेंद्र गायकवाड यांनी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांनी त्यांच्याविषयी विचार मांडले. या मराठी भाषा दिनाचे आयोजन प्रा. डॉ. धनवी आवटे (समन्वयक स्टाफ वेल्फेअर कमिटी) यांनी केले तसेच प्रा. राहुल कांबळे प्राध्यापक डॉ. दीपिका हसीजा,प्रा. तनुजा सुमन यांनी सहकार्य केले. महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या मराठी भाषा अवचित साधून वेगवेगळी नृत्य व गीते सादर केली व मराठी भाषेविषयी असणार प्रेम व आपुलकी प्रकट केली. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.