अलिबाग : जिमाका
केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सोमवारी (दि. 27) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. यामध्ये रायगड जिल्ह्यातील अंदाजे एक लाख आठ हजार 654 पात्र लाभार्थ्यांना 21 कोटी 73 लाख आठ हजार इतकी लाभाची रक्कम वितरीत करण्यात आली आहे.
अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरू केलेली केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्रातही राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार रुपये प्रती हप्ता या प्रमाणे तीन हप्त्यांत एकूण सहा हजार रुपये प्रती वर्ष लाभ मिळतो. त्यानुसार रायगड जिल्ह्यात या योजनेंतर्गत फेब्रुवारी 2019पासून एकूण एक लाख 75 हजार 612 लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे.
रायगडात जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे व तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या समन्वयाने पात्र शेतकर्यांना योजनेचा लाभ मिळाला आहे.
Check Also
पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन
मालमत्ता करावरील शास्ती माफ -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल ः रामप्रहर वृत्त फोरम, फेडरेशन यांच्या दिशाभूलीमुळे …