Breaking News

आदिवासी रायगड प्रीमियर लीग रंगणार

कळंबोली : बातमीदार
रायगडच्या विविध भागांत क्रिकेटचा फिवर वाढला आहे. जिल्ह्यात एकीकडे मोठ-मोठ्या स्पर्धा भरविल्या जात असताना खालापूरमधील आदिवासी तरुणांनी समाजातील क्रिकेटपटूंसाठी आदिवासी रायगड प्रीमियर लीग टेनिस क्रिकेट स्पर्धा 1 मार्चपासून आयोजित केली आहे. ही स्पर्धा चौक येथे खेळली जाणार आहे.
क्रिकेटच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना एकत्र आणण्यासाठी खालापूर तालुक्यातील महादू पिरकड, प्रकाश पवार, शरद ठोंबरे, विष्णू खैर यांनी चला खेळूया एकतेसाठी या संकल्पनेतून आदिवासी रायगड प्रीमियर लीगची स्थापना केली. या माध्यमातून ही स्पर्धा होत आहे. स्पर्धेत जिल्ह्यातील 20 संघमालकांनी नोंदणी केली असून 400 आदिवासी खेळाडू खेळणार आहेत.
स्पर्धेत प्रथम पारितोषिक एक लाख रुपये, द्वितीय 50 हजार रुपये, तृतीय व चतुर्थ प्रत्येकी 25 हजार आणि चारही विजेत्यांना भव्य चषक देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक सामन्यातील सामनावीरास आकर्षक चषक असणार आहे.

Check Also

रायगड बॅडमिंटन चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे शानदार उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून …

Leave a Reply