Breaking News

खांदेश्वर शिव मंदिर तलाव परिसरात स्वच्छता मोहीम; 14 टन कचरा गोळा

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महपालिका आणि संत निरंकारी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने बाबा हरविंदर सिंग यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग समिती ब कळंबोली अंतर्गत प्रभाग क्रमांक 16 मधील पुरातन खांदेश्वर शिव मंदिर तलाव व परिसरांतून रविवारी (दि. 26) 14 टन कचरा गोळा करण्यात आला. महापालिका, संत निरकांरी मंडळ यांच्या संयुक्त माध्यमातून आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ जल, स्वच्छ मन ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये महापालिकेच्या कळंबोली-नवीन पनवेल प्रभाग कार्यालयातील स्वच्छता निरीक्षक अरुण कांबळे, स्वच्छता कर्मचारी आणि संत निरंकारी मंडळाचे खांदा कॉलनी शाखेचे प्रमुख सत्यप्रकाश पाटील, नवीन पनवेल शाखेचे प्रमुख माणिक धर्माधिकारी, कळंबोली शाखेचे प्रमुख विलास कडू, सेक्टर संयोजक वसंत गौड, क्षेत्रिय संचालक अशोक केरेकर तसेच संत निरंकारी मंडळाच्या 200 ते 250 सदस्यांनी सहभाग घेतला. या वेळी खांदेश्वर तलावामधील निर्माल्य, मुर्त्या, प्लास्टिक गोळा करण्यात आले तसेच तलावा भोवतीचा जॉगिंग ट्रॅकचीदेखील स्वच्छता करण्यात आली.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply