पनवेल : वार्ताहर
पनवेल जवळील करंजाडे येथील एक म्हैस नाल्यात अचानक पडल्याची घटना घडली. सिडको फायर ब्रिग्रेडच्या अधिकार्यांनी घटनास्थळी पोहोचून या म्हशीची सुखरूप सुटका केली.
पनवेल जवळील करंजाडे आर 4 सेक्टर मधील उघड्या नाल्यात थेट नाल्यात पडली. स्थानिकांनी या म्हशीला काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर म्हैस नाल्यातून बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत जेसीबी आणि दोरखंड यांचा वापर करून त्या म्हशीची सुटका केली.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …