Breaking News

राष्ट्रीय गोमंतक गोवा पुरस्कारांचे आज वितरण

शैलेश पालकर यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

पोलादपूर : प्रतिनिधी

हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेचा तृतीय राष्ट्रीय गोमंतक गोवा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि. 22) मडगाव डवरली येथील श्री स्वामी समर्थ मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. त्यात पोलादपूर येथील ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.केंद्रीय संरक्षण आणि आयुष खात्याचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या सोहळ्याला ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कामत, पिंपरी पुणे येथील अशोक नागरी सहकारी बँकेचे संस्थापक अशोक शीलवंत, वास्तुशास्त्र तज्ज्ञ डॉ. रविराज अहिरराव, मंदिर समितीचे अध्यक्ष जयेश नाईक, अमिलिया वैद्य आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि संस्थांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्यात शैलेश पालकर यांना पत्रकारितेतील सातत्यपूर्ण काममिरीबद्दल गौरविण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष सुनील फडतरे यांनी सांगितले.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply