Breaking News

मुख्यमंत्र्यांना 10 लाख पत्र पाठविण्यास आजपासून सुरुवात -विक्रांत पाटील

पनवेल : वार्ताहर

विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करणारे विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक (काळे विधेयक) महाविकास आघाडी सरकारने मुद्दाम घाईघाईने पारित करून घेतले. या माध्यमातून प्र. कुलपती हे नवीन पद तयार करून सन्मा कुलपतींचे अधिकार उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांना दिले जाणार आहेत. त्यामुळे या काळ्या विधेयकाला विरोध करत विद्यार्थी बांधवांना सोबत घेऊन रविवारी (दि. 9) 10 लाख पत्र भारतीय जनता युवा मोर्चा मुख्यमंत्र्यांना पाठविणार आहोत, अशी माहिती भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिली.

विद्यापीठांना राजकारणाचा अड्डा बनविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. असा आरोप भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केला आहे. भविष्यात कुलगुरूंच्या नियुक्त्या, विद्यार्थ्यांच्या पदव्या या सगळ्यातच आरोग्य सेवक भरती परीक्षा, म्हाडा परीक्षा प्रमाणे करोडोंच्या भ्रष्टाचाराचे विषय करण्यासाठी यांना हे प्र.कुलपती पद पाहिजे का? हा प्रश्न विद्यार्थी विचारात आहेत. त्यामुळे या विधेयकाला विरोध करत 10 लाख पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविणार आहे. तसेच ज्यांचा या काळ्या कायद्याला विरोध आहे त्यांनी 7745050111 या क्रमांकावर मिसकॉल द्यावा, असेही आवाहन विक्रांत पाटील यांनी केले आहे.

Check Also

मच्छीमारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मंत्री नितेश राणे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई ः रामप्रहर वृत्तमत्स्यव्यवसाय क्षेत्रातील विविध प्रश्न, अडचणी आणि प्रलंबित मागण्यांबाबत राज्याचे मत्स्य व बंदरे …

Leave a Reply