Breaking News

उरणकरांची प्रतीक्षा संपली; खारकोपर-उरण मार्गावरून लोकल धावली!

उरण : प्रतिनिधी
उरणकरांना ज्याची प्रतीक्षा ती लोकल अखेर शुक्रवारी (दि. 10) धावली. त्यामुळे खारकोपर ते उरण मार्गावर येत्या काही दिवसांत ही सेवा सुरू होण्याची चिन्हे आहेत. उरणच्या लोकलची घटिका समीप आल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
मागील 27 वर्षांपासून उरणकरांना लोकल ट्रेनची प्रतीक्षा आहे. मुंबई आणि नवी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असतानाही उरणमधील नागरिकांना विशेषतः नवी मुंबईत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करीत प्रवास करावा लागत होता. त्यामुळे कमी वेळात आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळावी अशी आस लागून राहिलेली होती. ती आता प्रत्यक्षात उतरणार आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply